◼ तारापुरात रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जात होते समुद्रात; सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद झाल्यास तारापुर मधील प्रदुषणकारी सांडपाणी सोडणारे 800 कारखान्यांने होणार बंद
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: गेल्या अनेक वर्षांपासून तारापुर परिसराच्या व समुद्राच्या प्रदुषणासाठी जबाबदार असलेल्या सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला अखेर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सामुहिक सांडपाणी प्रक्रिया क्रेंद्रात रासायनिक सांडपाण्यावर पुर्णपणे प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट समुद्रात सोडले जात असल्याने ही कारवाई महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने केली आहे. सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद झाल्यास येथील 800 कारखान्यांना आपले उत्पादन बंद ठेवत कारखाने बंद ठेवावे लागणार असलेल्या प्रदुषणकारी कारखान्यांना मोठा दणका बसला आहे.
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातुन निघणारे रासायनिक सांडपाणी हे तारापुर एनवोर्मेन्ट प्रोटेक्शन सोसायटी प्लाँट नं. एएम 29 येथे प्रक्रिया केले जाते. येथील रासायनिक कारखान्यांचे सांडपाणी हे प्रक्रिया करण्यासाठी तारापुर एनवोर्मेन्ट प्रोटेक्शन सोसायटी प्लाँट नं. एएम 29 येथे जमा होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या परवानगी नुसार रासायनिक सांडपाण्यावर पुर्णपणे प्रक्रिया करून पाणी समुद्र सोडणे बंधनकारक आहे. मात्र खर्चिक प्रक्रिया पासुन वाचण्यासाठी व प्रमाणापेक्षा जास्त रासायनिक सांडपाणी सामुहिक सांडपाणी प्रक्रिया क्रेंद्रात येत असल्याने निम्म्या हुन अधिक रासायनिक सांडपाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करताच समुद्र सोडले जात होते. याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने अनेकदा सुचना करून सुध्दा याकडे दुर्लक्ष तारापुर एनवोर्मेन्ट प्रोटेक्शन सोसायटीने केल्याने प्रदुषणकारी सांडपाणी प्रक्रिया क्रेद्राला अखेर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील सामुहिक सांडपाणी प्रक्रिया क्रेंद्रात औद्योगिक क्षेत्रातील सुमारे 800 लहान मोठ्या कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी येते. कारखान्यांनी आपल्या कारखान्यातुन निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर कारखान्यातच प्रक्रिया करून त्यानंतर ते रासायनिक सांडपाणी मुख्य सामुहिक सांडपाणी प्रक्रिया क्रेंद्रात पाठवले जाते. मात्र आता सामुहिक सांडपाणी प्रक्रिया क्रेंद्र बंद करण्यात आल्याने येथील रासायनिक कारखान्यांना आपले उत्पादन थांबवावे लागणार आहे. यामुळे वारंवार प्रदुषणाकडे दुर्लक्ष करत रासायनिक प्रदुषण करणाऱ्या कारखान्यांना येत्या काही महिन्यांन करता तरी आपले कारखाने बंद ठेवावे लागणार आहेत.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने सामुहिक सांडपाणी प्रक्रिया क्रेंद्र बंद करण्याचे आदेश हे 6 मार्च रोजी दिले आहेत. मात्र त्याबाबत योग्य कारवाई करण्यासाठी इतर विभागांना त्यांची प्रत शनिवारी 7 मार्च रोजी दुपार नंतर उशिरा प्राप्त झाली. या आदेशात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला तातडीने पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच महाराष्ट्र विद्युत विजवितरण मंडळाला तातडीने विज पुरवठा बंद करण्याचे म्हटले होते.यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्राप्त झालेल्या आदेशानुसार तातडीने पाणीपुरवठा शनिवारी सायंकाळी उशिरा बंद केला असून विद्युत मंडळाचे उशीरा पर्यंत विज पुरवठा खंडित केलेला नाही.