पालघर दर्पण: वार्ताहर
विक्रमगड: वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावातील एका वस्तीवर वीज पडल्याने एकाच जागीच मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत.
वाडा तालुक्यातील अनेक भागात आज संध्याकाली विजांच्या गडगटासह पाऊस सुरू होता. या वेळी संध्याकाली 4 वाजण्याच्या च दरम्यान आंबिस्ते येथील एका वस्तीवर 6 जणांवर वीज पडली. या मध्ये सागर शांताराम दिवा (वय 17) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला संदिप अंकुश दिवा (वय 25) , अनंता चंद्रकांत वाघ (वय 24), रविंद्र माधव पवार (वय18), नितेश मनोहर दिवा (वय 19), सनी बाळु पवार (वय 18) हे पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना खानिवली येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.