पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: डहाणू तालुक्यातील तवा येथे वीज पडून रविवारी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास नितेश हाळ्या तुंबडा व अनिल सुधाकर धिंडा हे नमपाडा येथील युवक गंभीररित्या जखमी झाले. दोघांना धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. मात्र जखमीतील नितेश तुंबडा याचा मृत्यू झाला असून झाल्याचे जाहीर करण्यात आले. अनिल धिंडा हा शुद्धीत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.