◾ केमिकल माफियांना मोकळे रान देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांंन विरोधात तक्रारी होऊन देखील का घातले जाते पाठीशी
◾ हेमेंद्र पाटील
बोईसरचा दरोगा अहो ‘दरोडा’ नाही हा आजकाल केमिकल माफिया, भंगार माफिया, कारखान्यातील अपघात, विनयभंग, हाणामारी अशा अनेक प्रकरणात संधी शोधणारे बोईसर पोलीस यांची कितीही तक्रार करा कारवाई काही होत नाही. कारण गिधाडां सारखे एखाद्या प्रकरणात दरोडा टाकल्या सारखे संबंधित व्यक्तीला पुर्ण निचोडले जाते. गेल्या सहा महिन्यांत बोईसर पोलीस ठाण्यात अनेक तडजोडी झाल्या प्रत्येक प्रकरणात संधी शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तरीही पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाने बोईसरच्या दरोग्याची साधी चौकशी देखील केलेली नाही. यामुळे या दरोग्याची ताकद जास्तच वाढलेली दिसतेय तरी कायद्यावर विश्वास असल्याने असल्या अनधिकृत कामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार अशी आशा आहे.
अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब करणारे बोईसर पोलीस यांचा कारनामा याअगोदर उघड झाला होता. बोईसर मध्ये महिलांवर अत्याचार वाढले असताना तक्रारी घेवुन येणाऱ्या महिलांना व अल्पवयीन मुलींना न्यायासाठी तासंतास तात्कळत थांबावे लागते. त्यानंतर दरोगा साहेबांची परवानगी असेल तरच कारवाई होते त्याने कारण देखील तसेच आहे. तक्रार कोणा विरूद्ध आहे त्याला बोलवून संधी शोधली जात असून तडजोडी कडे जास्त भर दिला जातो. हे अनेक प्रकरणात उघड झाले असताना देखील कोणत्याही प्रकारची कारवाई बोईसर पोलीस निरीक्षक यांच्यावर झालेली नाही. त्यात एखाद्यावर गुन्हा दाखल झाला तर त्याला सोईस्कर पणे अटक बाबत मोकळीक दिली जाते. साहेबांची मर्जी राखली तर मग आरोपी पोलीस ठाण्याचा मालक असल्या सारखा पोलीस ठाण्यात वावरत असतो. पण त्यासाठी गुन्हेगार हा वजनदार हवा ही अट असणारच यात काही शंका नाही.
केमिकल माफिया व दरोगा साहेब यांचे घनिष्ट संबंध असून अशा माफियांना मोकळीक दिली जात आहे. दोन चार महिन्यात बोईसर पोलिसांनी पकडलेल्या केमिकल माफियांच्या गाड्या पोलिसांनी सोडून दिल्याचे उघड झाले असून काही प्रकरणात पोलीस अधीक्षक यांच्या कडे देखील तक्रारी दाखल आहेत. तारापूर औद्योगिक क्षेत्रातुन पुजा केमिकल या कारखान्यातील घातक रासायनिक घनकचरा 25 फेब्रुवारी 2020 रोजी बेकायदेशीर पणे घेवुन जात असताना बोईसर पोलिसांनी दुपारच्या वेळेस वाहन ताब्यात घेतले होते. मात्र मोठी आर्थिक तडजोड करून वाहन रात्री सोडून दिल्याचे उघड झाले आहे. यामध्ये एका व्यक्तीचा वायरल झालेल्या अँडीओ मध्ये बोईसरच्या साहेबांचे नाव पुढे आल्याने हा दरोगा साहेब किती मोठी तडजोड करतो हे उघड झाले आहे. कारखान्यातील घातक रासायनिक घनकचरा वाहतूक करणारे केमिकल माफियांंना तर दरोग्या चांगलाच आर्शिवाद असून एकाही केमिकल माफियावर ठोस कारवाई केलेली नाही.
औद्योगिक क्षेत्रातील केमिकल माफियांन बरोबर खत माफिया देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. मात्र हेच खत माफिया दरोग्याच्या अतिशय चांगल्या संपर्कात असलेले आहेत. अवधनगर येथील मोठे भंगार वाले तर दरोग्याची नेहमीच मर्जी राखत असल्याने त्यांच्या अनधिकृत कामाकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. यामुळे असल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून ठोस कारवाई प्रशासन नेमकी केव्हा करते हेच पाहावे लागणार आहे.