◾ पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात विज पडून मृत्यूचे सत्र सुरूच
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्यात नैसर्गिक विज पडून मृत्यू चे सत्र गेल्या दोन दिवसापासून सुरू असून बुधवारी तलासरी भागात दोन तरूणांचा विज अंगावर पडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. याभागात सायंकाळी विजेच्या कडकड्यासह पासून सुरू झाला होता.
तलासरी तालुक्यातील कुर्झे डॅम येथे अंगावर विज पडून सचिन जयराम कुवरा (27)आणि अतुल बाबु गोवारी (18)या दोघांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी अचानक विजेचा कडकडाट सुरू झालेल्या पावसाच्या वेळी सचिन व अतुल हे दोघेही कुर्झे डॅम येथे उभे होते. यावेळी अंगावर विज पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला हे दोघेही कुर्झे डॅम येथील सुरक्षा रक्षक असल्याचे समोर येत असून हे दोन्ही तरूण डहाणूतील बेंडगाव येथील रहिवासी आहेत.
◾ पालघर जिल्ह्यात रविवारी 6 सप्टेंबर रोजी विज पडून दोघांचा मृत्यू तर सहा लोक जखमी झाले होते. डहाणू तालुक्यातील तवा येथील साईबाबा मंदिरा जवळ उभा असलेला नितेश हाळ्या तुंबडा (22) याच्यावर वीज पडून मृत्यू झाला होता. वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील एका वस्तीत 6 जणांवर वीज पडली. या मध्ये सागर शांताराम दिवा (वय 17) याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली होती.