◼ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी
पालघर दर्पण: वार्ताहर
वाडा: सन 2021 च्या जनगणनेत ओबीसी समाजाच्या जनगणनेचा स्वतंत्र रकाना नसल्याने सर्वत्र ओबीसी समाजात नाराजीचे वातावरण पसरले असुन ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी वाडा तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येत ‘ जनगणना 2021 मध्ये ओबीसीचा रकाना नाही म्हणून ओबीसींंनी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकाला कुठलीही माहिती देऊ नका या आशयाची घरोघरी पाट्या लावण्यास सुरवात केली आहे. व जोपर्यंत ओबीसींची स्वतंत्र जनगणना केली जात नाही तोपर्यंत जणगणनेची कौटुंबिक माहिती देण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय येथील तरुणांनी घेतला आहे.
ओबीसी समाजाची 52 टक्के लोकसंख्या असतांनाही 19 टक्के आरक्षण दिले जात आहे. त्यातच काही जिल्ह्यांमध्ये हे आरक्षण 9 टक्के ठेवण्यात आले आहे तर पालघरसह काही जिल्ह्यांना ओबीसी समाजासाठी असलेले आरक्षणदेखील संपविण्यात येऊन ते शुन्यावर आणले आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठ्या प्रमाणात झाले आहे. पालघर जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण शैक्षणिक, सामाजिक, रोजगार व राजकिय क्षेत्रात अत्यंत कमी केल्याने या समाजातील लाखो सुशिक्षित बेरोजगारांवर नोकरीसाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. ओबीसी समाजाला संविधानाचे दिलेले अधिकार केंद्र शासन हिसकावून घेत आहेत. जनगणना करण्यासाठी काही महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. ओबीसी समाजात अनेक जाती जमातीचा समावेश आहे. जाती व जमातीची संख्या व लोकसंख्या यावर आरक्षण मिळायला पाहिजे पण तसे न करता समाजाला त्यांचे अधिकार मिळू द्यायचे नाही असेच शासनाचे धोरण असल्याचे दिसून येत आसल्याचा आरोप केला जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेत ओबीसी समाजांचा जनगणनेचा ठराव मंजूर करण्यात आला. पण हाच ठराव एकमताने केंद्राच्या संसदेत पास हेणे गरजेचे आहे. जर ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करणार नसेल तर येणाऱ्या जनगणना कार्यक्रमास असहकार पुकारण्याचा इशारा ओबीसी संघर्ष समितीतेने दिला आहे. व तसा ठराव देखील वाडा येथील कुणबी समाज गृहामध्ये झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. या बैठकीनंतर तालुक्यातील सापणे बु. गावातील केदार नाईक, सचिन भोईर, दिप लाटे, सागर नाईक, विशाल कडव या तरुणांनी एकत्र येऊन ओबीसी समाजाची नोंद करताना ती स्वतंत्र रकान्यात पोट जातीनियाह करावी अशी मागणी वाड्यातील ओबीसींनी केली आहे. व या जनगणनेत आमचा सहभाग नाही या आशयाच्या ठिकठिकाणी पाट्या लावून सन 2021च्या जनगणनेवर बहिष्कार असल्याचे वाडा तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
◼सुमारे 55 ते 60 टक्के असलेल्या ओबीसी समाजाचा शेक्षणिक, राजकिय व सामाजिक संबंध जनगणनेशी असल्यामुळे येत्या 2021 च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र गणना करावी.
— प्रल्हाद सावंत, सेवानिवृत्त शिक्षक वाडा