◾ बोईसर ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांचे अजब व्यक्तव्य; जखमी झालेल्या रुग्णाला ठेवले तात्कळत उभे
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: करोनाच्या काळात बोईसर मधील आरोग्य वेवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून गरिब रुग्णांना इतर दुखापत व आजाराबाबत ग्रामीण रुग्णालयात उपचार देखील मिळताना कसरत करावी लागत आहे. असाच प्रकार शुक्रवारी दुपारी घडला असून एक जखमी असलेल्या तरूणाला लाईट नाही जनरेटर बंद आहे. असे कारण दे बोईसर ग्रामीण रुग्णालयातील डाँक्टरांनी उपचार केले नसल्याचा प्रकार घडला आहे.
बोईसर ग्रामीण रुग्णालय अगोदरच शेवटच्या घटका मोजत असताना येथील काही कर्मचारी व डाँक्टर देखील रुग्णसेवेला कंटाळून गेल्याचे दिसून येते. याठिकाणी मुलभूत सुविधा तर नाही त्यापेक्षा येणाऱ्या रुग्णांना तात्कळत उभे ठेवले जाते. शुक्रवारी 9 आँगस्ट रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान मुकेश कुमार (22) या तरूणाला दुचाकी अपघातात पायावर दुखापत झाली म्हणून बोईसर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र येथे लाईट नाही जनरेटर बंद आहे उपचार होणार नाही असे कारण येथील डॉक्टर स्नेहा जाधव यांनी देत प्राथमिक उपचार देखील केले नाही. दरम्यान तासभर थांबलेल्या तरूणाला जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला बोईसर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यामुळे बोईसर ग्रामीण रुग्णालयाची ढिसाळलेली आरोग्य यंत्रणा उघड झाली. या संपूर्ण प्रकाराबाबत बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजेंद्र केळकर यांना संपर्क साधला असता त्यांनी याबाबत तातडीने उपचार करण्यासाठी सांगतो असे उत्तर दिले. परंतु त्यानंतर देखील या तरूणावर उपचार झाले नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
बोईसर मध्ये वाढती लोकसंख्या यामुळे इथे सुसज्ज रुग्णालयाची उभारणी अत्यंत आवश्यक आहे. लालफितीत अडकलेल्या नवीन ग्रामीण रुग्णालयाचा विषय मार्गी लागेल तेव्हा लागेल परंतु सद्यस्थितीत येथील रुग्णसेवा सुधारण्याची अत्यंत आवश्यकता आहे. यातच याभागात मोठ्या प्रमाणात कामगार राहत असल्याने उपचारासाठी ते बोईसर ग्रामीण रुग्णालयात जात असतात. मात्र येथील व्यवस्था अतिशय कुचकामी असल्याने गरिब रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप रुग्णांन कडून होत आहे. ग्रामीण रुग्णालयात लाईट नाही जनरेटर बंद अशी कारणे देवून रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्य विभागाचे धिंडवडे निघाले आहेत. यातच करोना मध्ये इतर यंत्रणा व्यस्त असल्याने इतर आजारावर उपचार घेण्यासाठी नागरिकांना दमछाक होत असल्याने प्रशासनाने बोईसरचीआरोग्य व्यवस्थेत सुधारणा करावी अशी मागणी केली जात आहे.