■ आशियात ब्लु फ्लॅग मिळणारा भारत हा चौथा देश ठरला; पंतप्रधांनी केले कौतुक
पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
देशातील आठ समुद्र किनाऱ्यांना ‘ब्लु फ्लॅग’ पुरस्काराने गौरविण्यात आले असून ही बाब भारतासाठी मोठ्या अभिमानाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटर वर ट्विट करून भारतातील समुद्र किनाऱ्यांना मिळालेल्या ‘ब्लु फ्लॅग’पुरस्कार बाबत आनंद व्यक्त करत कौतुक देखील केले आहे.
केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी ही माहिती दिली असून भारतातील द्वारका, शिवराजपुर, घोघला, कासरकोड, कप्पड, ऋषीकोंडा, अंदमान आणि निकोबार या आठ समुद्र किनाऱ्याना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यूएनईपी, यूएनडब्लूटीओ, एफईई, आययूसीएन असा आंतरराष्ट्रीय सदस्यांचा समावेश असलेल्या ज्युरीच्या गटाने एकाचवेळी आठ समुद्र किनाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच ब्लु फ्लॅग पुरस्कारा बरोबर समुद्र किनाऱ्यांवरील प्रदूषण नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय बेस्ट प्रॅक्टिस या पुरस्कारासाठी देखील भारताची निवड करण्यात आली आहे. आशिया खंडातील ब्लु फ्लॅग पुरस्कार मिळविणारा भारत हा चौथा देश ठरला आहे.
केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी ट्विट मध्ये संगीतले की, या आधी एकाच वेळी आठ समुद्र किनाऱ्यांना ब्लु फ्लॅग देऊन आता पर्यंत कोणत्याही देशाला गौरविण्यात आले नाही. हे बघता भारताची कामगिरी ही उल्लेखनीय आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी देखील भारतातील आठ प्रसन्न समुद्रकिनाऱ्यास प्रतिष्ठित ब्लु फ्लॅग पुरस्कार मिळाला असल्याची माहिती देऊन कौतुक केले आहे.