◾ पालघर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा कनिष्ठ सहायकाला लाच घेताना रंगेहात पकडले
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा कनिष्ठ सहायक प्रकाश पागी याला सहा हजाराची लाच घेताना लाचलूपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाने रंगेहात पकडले आहे. नवनिर्वाचित पालघर जिल्हा लाचखोर अधिकाऱ्यांंचा भरणा असल्याचे अशा कारवाईतुन दिसून येत आहे.
पालघर जिल्हा परिषद बांधकाम विभागात तक्रारदारकडून एका कामाचे देयक काढून घेण्यासाठी कनिष्ठ सहायक प्रकाश पागी याने सहा हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत विभागाला कळविल्यानंतर त्यांनी या प्रकरणात तथ्यता तपासली असता लाच मागितल्याने स्पष्ट झाले. त्यानुसार लाचलूचपत विभागाने बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा रचून पागी याला रंगेहात लाच घेताना पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक भारत साळुंखे व पो.ह – मांजरेकर, पो.ना.सुवारे,सुतार,पालवे, सुमडा, चव्हाण आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे.