■ राज्यपालांनी पत्रात वापरलेल्या भाषेवरून पवारांनी व्यक केली नाराजी
पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिले होते. या पत्रात रेस्टोरेन्ट व बार सुरु असून राज्यातील मंदिरे बंद का? असा प्रश्न या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला होता. त्याच बरोबर आपण कट्टर हिंदुत्ववादी आहात असे देखील या पत्रात लिहिले होते. मात्र यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पत्रात लिहिलेली भाषा यावर नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राबाबत सर्वत्र माध्यमांवर चर्चा सुरु होती. यावर शरद पवारांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र मुख्यमंत्र्यांनाच्या निर्णयाला पाठींबा देणारे आहे. राज्यपाल एखाद्या मुद्द्यावर स्वतंत्र मत मांडू शकतात हे मान्य आहे मात्र पत्रात वापरलेली भाषा ही अयोग्य असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे.
■ पंतप्रधानांना शरद पवारांनी दिलेल्या पत्रात नेमके काय म्हटलं आहे.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात शरद पवार म्हणतात की, राज्यपालांनी लिहिलेलं पत्र माध्यमांवर प्रसिद्ध होणे व पत्रात वापरलेली भाषा वाचून धक्का बसला. वापलेल्या अयोग्य भाषेची तुम्ही दखल घ्याल याची खात्री आहे. हे पत्र एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला लिहिल्या सारखे वाटत आहे. लोकशाहीत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मुक्त संवाद होणे गरजेचे आहे, यावर माझा विश्वास आहे. मात्र मत आणि भूमिका मांडताना पदाचा मान राखला गेला पाहिजे. मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याशी मी चर्चा केली नाही. मात्र राज्यपालांचे पत्र वागण्याने आपल्या दुःख झाले. त्याच बरोबर घटनाक्रम पाहता मुख्यमंत्र्यांकडे आपले उत्तर माध्यमांवर प्रसिद्ध करण्याखेरीस कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठींबा आहे. राज्यपालांनी मंदिर खुले करण्याची मागणी केली होती. त्यावर शरद पवार म्हणतात की, कोरोनाला रोखण्यासाठी तुम्ही अंतर ठेवण्यासंबंधी घोषणा दिली होती. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली माझं घर माझं कुटुंब मोहीम राबवली जात आहे. जनतेला सोशल डिस्टनसिंग बाबत महत्व पटवून दिले जात आहे. अशा वेळी राज्यातील देवस्थान विठ्ठल मंदर, शिर्डी साईबाबा मंदिर, सिद्धीविनायक मंदिर अशा ठिकाणी सोशल डिस्टनसिंग पाळणे शक्य नाही.