पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
नॉर्वे सरकारने देशातील नागरिकांना करोनाची लस मोफत देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. नॉर्वे सरकारच्या मते जेव्हा करोना लस निर्मिती होईल तेव्हा लस मोफत वाटणे हा देशाच्या लसीकरण मोहिमेचा भाग असेल. नॉर्वेचे पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी, आम्हाला जास्तीत जास्त नागरीकांपर्यंत प्रभावी लस सुरक्षितपणे पोहचवायची आहे असे सांगितले.
स्वीडन देश हा नॉर्वेच्या शेजारील देश असून युरोपियन युनियनचा सदस्य आहे. यादेशाकडून करोनाच्या लसीची अतिरिक्त खरेदी करणार असून त्याची विक्री नॉर्वेला करणार आहे. युरोपियन युनियन काही फार्मा कंपन्यांशी करोनाची लस उपलब्ध करण्याबाबाबत चर्चा करीत आहे. नॉर्वेतही ही लस उपलब्ध करण्यात येईल असेही त्या देशाने सांगितले