पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
दिल्लीतील तीन व्यक्तींकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची व ठाकरे यांच्या नेत्तुत्वाखाली महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून याचिकाकर्त्यांची चांगलीच कान उघडणी केली.
सामाजिक कार्यकर्ते विक्रम गेहलोत, गौतम शर्मा व वकील रिषभ जैन या तिघांनी राष्ट्रपती राजवटीसाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेत अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यू प्रकरबाबतचा आधावर महाराष्ट्र सरकारच्या हाताळणीवर दोषारोप करण्यात आले होते. किमान मुंबई किंवा त्यांच्या शेजारील जिल्हयांमध्ये सशस्त्र दल तैनात केले जावे अशी मागणी केली होती. मात्र महाराष्ट्र राज्य हे किती मोठे आहे हे तुम्हाला माहित आहे का? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारून याचिका कर्त्यांची कानउघडणी केली. तुम्हीं करत असलेले उल्लेख मुंबई मधील असून त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकत नाही असे सांगितले. त्याच बरोबर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी देशाचे नागरिक म्हणून तुम्हाला राष्ट्रपतींकडे अर्ज करण्याचं स्वतंत्र आहे असे देखील सांगितले.