पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
मुंबई: सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी २३ व्या मजल्यावरून स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. हा व्हिडीओ पोलिसांच्या नजरेस पडल्या नंतर व्हिडीओत स्टंट करणाऱ्या तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासा दरम्यान हा व्हिडीओ मुंबईचा असल्याचे समजले व त्या नंतर तात्काळ तपास सुरु करून तरुणाला अटक केली.
मुंबई मधील कांदिवली येथील भारत बिल्डिंग मधील राहणाऱ्या एका तरुणाने २३ व्या मजल्यावरर स्टंस्ट व्हिडीओ शूट करून सोशल मीडिया वर अपलोड केला. या दरम्यान स्टंटचा व्हिडीओ असल्या कारणाने कमी वेळात या व्हिडीओ ला जास्त प्रसिद्धी मिळाली. मात्र पोलिसांच्या नजरेस हा व्हिडीओ पडताच पोलिसांनी टंस्ट करणाऱ्या तरुणाचा शोध घेतला. गुरुवारी रात्री तरुणाला अटक करण्यात आली. टंस्ट करणारा हा तरुण शैक्षणिक शिक्षण घेत असून त्याला असेच नवनवीन जीव घेणे स्टंट करण्याची आवड असल्याची समोर आले. त्याच बरोबर तरुणाचे मित्र देखील त्याचासोबत स्टंट करत असतात असे चौकशी दरम्यान समजले. स्टंट हे जीवघेणे असल्याने तसेच अजून कोणी तास व्हिडीओ व्हायरल करू नये यासाठी पोलीस तरुणाच्या इतरही मित्रांना शोधत आहे.