पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्यपालांन नंतर आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दावने पैठण येथे ऐतिहासिक पालखी ओटा परिसरातील विकास कामांचे भूमी पूजना प्रसंगी केलेल्या वक्तव्यात घरातून बाहेर निघा असे म्हणत मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
परतीच्या पावसाने गेल्या ४ दिवसात विदर्भ व मराठवाड्यात धुमाकूळ मजवला असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. असे असले तरीही केंद्र व राज्यसरकारने मदतीची घोषणा केलेली नाही. मात्र काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आले. त्यामुळे राजा प्रजेत गेला पाहिजे. प्रजेच दुःख वाटून घेतलं पाहिजे. दुःखात सहभागी झाल पाहिजे मात्र मुख्यमंत्री हे माझे कुटुंब माझी जबाबदारी असे म्हणत घरात बसले आहेत असे सांगत रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
आमच्या सरकारनं शेतकरी, गोरगरीबांना अनेक योजना दिल्या. या राज्य सरकारनं काय दिलं? हे सरकार चालवतय कोण? निर्णय घेतंय कोण? हे काही कळत नाही या राज्याच काय होईल सांगता येत नाही. असे प्रश्न दानवे यांनी उपस्थित केले.