◾ पुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना विरोध व सत्ताधाऱ्यांन मध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच
पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
मुंबई: परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला. यामध्ये शेकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेे. या दरम्यान अनेक नेते मंडळींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या भेटीसाठी घराबाहेर पडले नसल्याने भाजप नेत्यांनी टीका केली होती. त्यानंतर सोमवारी १९ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री यांनी सोलापुरात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सोलापुरात पाहणी केल्या नंतर सध्या कोणतीही घोषणा करणार नाही. पंचनामे करून सरकार मदत करणार आहे असे सांगितले.
पुरग्रस्त भागातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून नुकसानग्रस्त भागाची अजून २ दिवस पाहणी करणार आहे. जीवितहानी होऊ नये हे आमचं प्राधान्य आहे. यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याच बरोबर मी आज काही घोषणा केली नाही. प्रत्यक्ष माहिती घेऊन मदत करण्यात येईल. त्याच बरोबर परतीच्या पावसाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणार नसून केंद्राकडून मदत मिळेल असे आश्वासन पंतप्रधान यांनी फोनवरून दिले.
मात्र या प्रकारात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी थिल्लरबाजी करू नये अस म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाण साधला. देवेंद्र फडवीस यांनी दिल्लीत जावं मग पंतप्रधानही बाहेर पडतील. नाहीतरी ते बिहार ला जातच आहेत. असे मुख्यमंत्री यांनी वक्तव्य केलं हे वक्तव्य असंवेदनशील आहे असे फडणवीसांनी सांगितले. कठीण समयी लोकांना काय मदत करता हे अपेक्षित आहे. मोदीजी थेट लडाखला जातात त्यामुळे स्वतःची तुलना करू नये. मुख्यमंत्री काही तासांचा प्रवास करून घराबाहेर पडले ही मोठी गोष्ट आहे. इतर गोष्टी सोडून राज्य सरकार आता काय मदत करते याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी.