पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
मुंबई: मनसेने इशारा दिल्या नंतर अँमेझॉनवर मराठी भाषेचाही समावेश करण्यात येईल असे अँमेझॉन कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच अँमेझॉन वेबसईडवर हिंदी, इंग्रजी, गुजराती, तेलगू व तमिळसह मराठी भाषेचाही समावेश आपल्याला पाहायला मिळणार आहे.
ऑनलाईन डिजिटल शॉपिंग अँप अँमेझॉन मध्ये मराठी भाषेचा समावेश नसल्यामुळे १५ ऑक्टोबरला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अँमेझॉन व फ्लिपकार्ट या ऑनलाईन डिझिटल शॉपिंग कंपन्यांच्या मुंबईतील कार्यालयांना भेट देऊन मराठी भाषेचा वापरा बाबत मागणी केली होती. व तसे न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. त्या नंतर अँमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉन यांनी दखल घेतली असून कंपनीने मराठी भाषेच्या मागणीवर सकारात्मक विचार करू अस ई-मेल पाठवला आहे.