■ फडणवीसांचा अहंपणा नडला; एकनाथ खडसे
पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
मुंबई: जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असे सांगितले आहे. यादरम्यान मला प्रवेशासाठी कोणतेही आश्वासन दिले नाही. त्याच बरोबर माझीही काही अपेक्षा नसून फक्त माझा मतदारसंघातील विकास काम सरकारच्या माध्यमांतून पूर्ण केली जावीत अशी ईच्छा आहे असे सांगितले.
यादरम्यान खडसेंनी फडणवीसांवर बऱ्याच टीका केल्या. देवेंद्र फडणवीस जोपर्यंत आहेत तो पर्यंत मला न्याय मिळणार नाही अशी भावना निर्माण झाली होती म्हणून पक्ष सोडला असे खडसेंनी सांगितले. मी पक्षाला दोष दिला नाही नेतृत्वाला दिला आहे. एकाही नेत्याने भाजप सोडणार कळल्यावर फोन केला नाही. चार दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी फोन केला. फडविसंचा मी पण लोकांना आवडला नसल्याने सत्ता हातातून गेली. त्यांचा अहंपणा त्यांना नडला असल्याचे खडसे म्हणाले.
माझावर विनयभंगाची केस दाखल केली. माझी चौकशी करण्यासाठी फडणवीस यांनी परवानगी दिली. मी नालायक असतो तर ४० वर्षात एकही वाईट मत अस आलं नाही. फडणवीस नेतृत्व करायचे त्याचा राग आहे. तिकीट दिलं नाही याचं दुःख मला नाही मात्र आरोप केले यामुळे मी दुःखी आहे. पक्षात आयते न येता पक्षासाठी काम केली आहेत. पक्षाला आपली गरज नाही असे समजल्यावर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असे एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.