■ तर कमळ बाजूला करून हातात घड्याळ बांधत खडसेंची राजकीय प्रवासाल सुरुवात
पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
मुंबई: भाजपमध्ये सतत डावलले जात असल्यामुळे खडसे नाराज होते. ४० वर्षापासून एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षासाठी एकनिष्ठेने काम केले असून सुद्धा पदरात निराशा आली असल्याने खडसेंनी भाजप ला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे शुक्रवारी भाजपमध्ये येणार असल्याचे सांगितले होते. हे अखेर खरे ठरले असून आज राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित खडसे यांनी प्रवेश केला. यावेळी खा.प्रफुल पटेल, खा.सुनील तटकरे, खा.सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, विधानसभा माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड.