■ ढाबाचे मालक कांता प्रसाद कडून युट्युबर गौरव वासन विरोधात तक्रार.
पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांची व्यथा मंडणारा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला होता. व्हिडीओ प्रसिद्ध झाल्या नंतर ढाब्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमू लागली होती. तसेच काहींनी त्यांना आर्थिक मदत देखील केली होती. मात्र मदतीच्या पैशात व्हिडीओ बनवणाऱ्या युट्युबर गौरव वासनने अफरातफर केली असल्याचा आरोप कांत प्रसाद यांनी केला असून मालवीय नगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे.
लॉकडाऊन लागल्यामुळे बाबा का ढाबा बंद ठेवावा लागला.६ महिन्यांनी अनलॉक नंतर कांता प्रसाद यांनी ढाबा पुन्हा सुरू केला मात्र करोनाच्या भीतीमुळे ढाब्यावर कोणीही यायला तयार नव्हते. यामुळे कांता प्रसाद व त्यांच्या पत्नीवर हालाकीचे दिवस आले होते. दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत होती. याच दरम्यान जवळपास ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला यु-ट्युबर गौरव वासन याने कांता प्रसाद व त्यांची पत्नी बादामी देवी यांची व्यस्थ मांडणार व्हिडिओ त्याच्या युट्युब चॅनलवर अपलोड केला. या व्हिडिओमध्ये कांता प्रसाद व त्यांची पत्नी रडत आपलं दुःख व्यक्त करत असताना दिसले. १०० रुपयांपेक्षाही कमी उत्पन्न मिळते असे सदर व्हिडीओमध्ये कांता प्रसाद यांनी सांगितले.
हा व्यथा मांडणार व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच. अनेक खवय्यांनी बाबा का ढाबावर गर्दी केली. काहींनी आर्थिक मदत देखील केली मात्र कांता प्रसाद यांनी मदतीच्या पैशांची अफरातफर केली असल्याचा आरोप युट्युबर गौरव वासन वर केला आहे. त्यांच्या माहिती नुसार गौरवने जाणीवपूर्वक केवळ स्वतःच्या व त्याच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांची माहिती शेअर करून मोठी रक्कम जमा केली. तसच गौरवने कांता प्रसाद यांना कोणत्याही व्यवहाराची महिती दिली नाही. तर दुसरीकडे गैरव वासनने आरोप फेटाळले असून मदतीची सर्व रक्कम कांता प्रसाद यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केली असे सांगितले. बाबा त्रास होऊ नये म्हणून मी माझा बँकेच्या खात्याची माहिती दिली असे सांगत बँक खात्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली.