पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: लघुपाटबंधारे विभागाच्या मनोर गावच्या हद्दीतील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा सोमवारी (ता.02) बुडून मृत्यू झाला. चेतन चंदू भुयाळ (वय.22) असे मयत तरुणाचे नाव असून तो मनोरच्या हायस्कुल डोंगरीचा रहिवासी होता.धरणाच्या पाण्यात पोहताना थकवा आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने संगीतले. मनोरच्या आदिवासी एकता मित्र मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता या नात्याने मंडळाकडून आयोजित सामाजिक आणि धार्मिक कार्यात तो पुढाकार घेत होता.