◾ मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे अनेक कारखान्यांचा एकत्र करून पाठवल्या जाणाऱ्या घनकचरा थांबविण्याची मागणी; निर्धार संघटनेने प्रादेशिक अधिकारी यांची भेट घेवून दिले निवेदन
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन होणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. येथील बड्या उद्योजकांच्या प्रदूषणकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अनेकदा केला जातो. याबाबत आता सामाजिक संघटनांनी आवाज उचलला असून रासायनिक कारखान्यांचे प्रदूषण व मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे कारखान्यांचा एकत्र करून पाठवल्या जाणाऱ्या वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाईल या स्ट्रील उद्योग कारखान्यातुन गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात लालासर असलेला धुर सोडला जात रोज मोठ्या प्रमाणात लालसर असलेला धुर सोडला जात असल्याने सभोवताली परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. लोखंडावर प्रक्रिया करताना हा निघणारा रासायनिक व धुळीकण असलेला वायू संपूर्ण परिसरात पसरला जातो. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी निर्धार संघटनेचे अध्यक्ष कुंदन संखे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांची भेट घेवून प्रदूषणाबाबत जाब विचारण्यात आला.
प्रदूषणकारी कारखान्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांन कडून वारंवार केला जात आहे. रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या व स्टिल उत्पादन घेणाऱ्या कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे वायुप्रदूषण होऊ नये यासाठी स्क्रबर सिस्टमचा वापर करणे आवश्यक असते. परंतु ही प्रक्रिया खर्चीक असल्याने कारखान्यांकडून तिचा वापर केला जात नाही. यामुळे तारापूर औद्योगिक परिसरातील बोईसर, सरावली, कोलवडे, कुंभवली, पाम, पास्थळ व सालवड या गावांतील रहिवाशांना रात्रीच्या वेळी होणाऱ्या वायुप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथील रहिवाशांना आरोग्यांच्या अनेक समस्या भेडसावत आहेत. नियमांचे उल्लंघन करून रासायनिक वायूचे उत्सर्जन करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
◾ कारखानदारा कडून नियमबाह्य रासायनिक घनकचरा वाहतूकीवर कारवाईची मागणी
औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन निघणारा घातक रासायनिक घनकचरा मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे प्रक्रिया करण्यासाठी पाठविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दर आकारले जातात. मात्र तारापूर मधील रासायनिक घनकचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांचे दलाल हे कारखान्यातील रासायनिक घनकचरा एकत्र संकलीत करून बेकायदेशीर पणे त्यांची वाहतूक करतात.
रासायनिक घनकचरा नेमका कुठल्या रसायनाचा आहे, याबाबत कोणत्याही प्रकारची तपासणी न करताच कमी खर्चात प्रक्रिया व्हावी यासाठी एकाच वाहनातून घातक रसायन संकलित करून पाठवले जात आहे. रासायनिक घातक घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची नवी शक्कल येथील उद्योजकांनी लावली असून याबाबत निर्धार संघटनेने विषय उपस्थित केल्याने याबाबत तातडीने कारवाई केली जाईल असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी सांगितले.