■ पालघर दर्पणच्या बातमी नंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतले रसायनांचे नमुने; औद्योगिक क्षेत्रातील जी-झोन मधील एका बड्या कारखानदाराचे रसायन असल्याची माहिती समोर
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका बड्या उद्योजका कडून रात्रीच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या घातक रसायनाचे नमुने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले आहेत. येथील एस झोन मध्ये एका बंद असलेल्या कारखान्याच्या बाजूला असलेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत बेकायदेशीर पणे घातक रसायन सोडले जात असल्याचे वृत्त पालघर दर्पणने प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता. यानुसार घातक रसायनाचे नमुने घेऊन तपासणी साठी पाठविण्यात आले असून तपासणी अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार आहे.
औद्योगिक क्षेत्रातील सत्तरबंगला भागात असलेल्या डब्ल्यू झोन व त्याच्या समोर असलेल्या एस झोन मध्ये एका बंद असलेल्या कारखान्याच्या भागात घातक रसायनाने भरलेले टँकर खाली केले जात असल्याचे समोर आले होते. बुधवारी 28 आँक्टोबर रोजी दुपारी एस झोन भागातील पावसाळी पाणी वाहुन नेणाऱ्या गटारात पिवळ्या रंगाचे असलेले रसायन वाहुन जात असताना दिसत होते. याबाबत पालघर दर्पणने प्रसिद्ध केल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानच्या क्षेत्र अधिकारी यांनी पावसाळी नाल्यात जमा झालेल्या रसायनाचे नमुने तपासणी साठी प्रयोग शाळेत पाठवले असून अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांन कडून सांगण्यात आले आहे.
केमिकल माफियांना हाताशी घेऊन औद्योगिक क्षेत्रातील ‘जी’ झोन मध्ये असलेल्या एका बड्या उद्योजकांच्या कारखान्यातून हे रसायन आणले जाते. त्यानंतर एस झोन मधील एका बंद असलेल्या परंतु लाखोची उलाढाल होणाऱ्या कारखान्यात बेकायदेशीर पणे रसायन भरलेले टँकर रिकामे केली जातात. बंद कारखान्यातुन छुप्या पध्दतीने टाकलेल्या वाहिनीतुन हे रसायन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत सोडले जाते. तसेच त्याच भागात रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीच्या चेंबरला नियमबाह्य पणे छिद्र पाडून हे रासायनिक सांडपाणी पावसाळी पाणी वाहणाऱ्या नाल्यात येते यामुळे हे रासायनिक सांडपाणी थेट नैसर्गिक नाल्यात जावुन मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.
◾तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ‘जी’ झोन मध्ये असलेल्या औषधांचा कच्चा माल बनविणाऱ्या एका बड्या कारखान्यातून रासायनिक प्रक्रिया केल्या नंतर “सिप्रोफॉक्ससन सेक्ड काँप”(Ciprofloxacin 2rd Crop) हे घातक रसायनाची विल्हेवाट लावली जात असल्याची खात्रीशीर माहिती हाती लागली आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांना विचारणा केली नसता त्यांनी क्षेत्र अधिकारी गजानन पवार यांना संपर्क साधण्यासाठी सांगितले. क्षेत्र अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनी नैसर्गिक नाल्यात सोडण्यात आलेल्या रसायनाचे नमुने घेतले असल्याचे सांगत. तपासणी अहवाल दोन दिवसात आल्यानंतर संबंधित कारखान्यांवर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.