पालघर दर्पण : शिवानी रेवरे
बोईसर: पालघर जिल्हातील बोईसर येथे दिवसेंदिवस नवनवीन सोनसाखळी चोरींच्या प्रकरणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच बोईसर पोलीसांनी सर्व नागरिकांना सोनसाखळी चोरणाऱ्या चोरांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
दिवसेंदिवस सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढत चालले असून बोईसर मधील एखाद्या भागात कुठे ना कुठे सोनसाखळी चोरीेच्या घटना घडत आहेत. महिला चालत असताना मागून भर रस्त्यात वेगाने मोटर मोटरसायकल वरून येणारे चोर संधी साधत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चैन तसेच सोन्याचे दागिने खेचुन घेऊन जातात. त्यामुळे बोईसर पोलिसांनी नागरिकांना तसेच विशेषतः महिलांना सावध राहण्याचे आवाहन केलं आहे. बोईसर मधील बऱ्याचशा नाक्यावर नागरिकांना सावध करण्यासाठी फलक लावण्यात आले आहे.
या फलकात महिलांनी दागिन्यांचे प्रदर्शन न करता दागिने ओढणी किंवा या पदराखाली झाकुन ठेवावे. दागिने खेचल्याचे लक्षात येताच आरडा ओरडा करावा शांत राहू नये. तसेच दागिने खेचणाऱ्या चोरांच्या गाडीचे नंबर, गाडीचे प्रकार व त्याचे चेहरे लक्षात ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.