पालघर दर्पण: वार्ताहर
वाडा: वाडा येथील एका विकासकाच्या दस्त ऐवजाची नोंदणी करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच स्विकारताना पालघर विभागाच्या लाच लुचपत प्रतिबंधक अधिका-यांनी शुक्रवारी संध्याकाळी उशिरा वाडा येथील दुय्यम निबंधक अधिकारी सर्जेराव चाटे यांस रंगेहाथ पकडले.
दस्तऐवज नोंदणी करण्यासाठी 30 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. या रक्कमेपैकी वाड्यातील विकासकाकडून 20 हजार रुपये घेताना शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजता दुय्यम निबंधक कार्यालयातच रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पालघर विभागाचे पोलिस उपअधीक्षक के.एस.हेगाजे, पोलिस निरीक्षक भारत साळुंखे यांच्या पथकाने केली.