◾सिजेंटा कंपनीच्या बोगस बियांनामुळे शेतकऱ्याच लाखोचे नुकसान
पालघर दर्पण : सचिन भोईर
विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील ओंदे गावातील तरुण शेतकरी सूचित घरत याने आपल्या 10 गुंठा जागेत पॉलिहाऊस तयार करून नामांकित असलेल्या सिजेंटा सिडस कंपनीचे टॉमेटो बियाणे आणून त्याची लागवड केली होती. मात्र हे बियाणे बोगस निघाल्याने या टॉमेटोच्या झाडांना फळधारणा झालीच नसल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सूचित घरत हे विक्रमगड तालुक्यातील एक प्रयोगशील तरुण शेतकरी आहेत. ते आपल्या शेतीत विविध प्रकारची पिके घेत असतात. त्यांनी आपल्या शेतीमध्ये 10 गुंठा जागेत पॉलिहाऊस उभे केले आहे. या पॉलिहाऊसमध्ये त्यांनी 1 जून रोजी सिजेंटा सिडस कंपनीच्या मायला वाणांची लागवड केली होती. 1 जून रोजी या बियाणांची पेरणी करून तयार झालेल्या रोपांची 23 व 24 जून रोजी लागवड केली होती.ही पूर्ण पेरणी व लागवड कंपनीच्या मार्गदर्शनानुसार सदर बनविलेल्या पॉलिहाऊसमध्ये सरी, वरंबा व त्यावर प्लास्टिक मल्चिंग पेपर टाकून ठिंबक सिंचन पद्धतीने केली होती. त्यांनतर तयार झालेल्या झाडाला लोखंडी तार व सुतळी धाग्याने झाडाला चांगल्या पद्धतीने आधार दिला होता. त्याच प्रमाणे कंपनीच्या मार्गदर्शनानुसार टॉमेटोच्या झाडांना खते, पाणी व कीटकनाशके दिली होती.
टॉमेटोच्या झाडांना लागवड झाल्यानंतर 65 ते 70 दिवसांत फळधारणा व्हायला पाहिजे होती मात्र 120 दिवसांपर्यंत सूचित घरत या शेतकऱ्यांनी या झाडांची मशागत देखभाल करूनसुद्धा या टॉमेटोच्या झाडांना फळधारणा झाली नाही. त्यामुळे या बोगस मिळाल्यामुळे या शेतकऱ्याचे मेहनतीसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या बाबत सूचित घरत यांनी विक्रमडचे तालुका कृषी अधिकारी आर. यु. इभाड यांच्याकडे टॉमेटोच्या बोगस बियांनाबाबत लेखी तक्रार केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी तसेच कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्राज्ञ उत्तम सहाणे, पंचायत समिती विक्रमगडचे कृषी अधिकारी एस. एस. ठाकरे यांच्या समितीने केलेल्या पाहणीत त्यांना हे बियाणे सदोष आढळले असून तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फतयेथे फुल आणि फळ धारणा झाली नसल्याचा अहवाल त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,पालघर यांना पाठविला आहे.
◾ सूचित घरत यांनी 10 गुंठा जागेत 9 हजारांचे टॉमेटो बियाणे आणले होते. तर त्यांनतर जवळपास 4 महिने मजुरी खर्च, खत, औषध यासाठी या शेतकऱ्याचा जवळपास एक लाखांपर्यंत खर्च झाला आहे. यातून सूचित घरत यांना 4 ते 5 लाख रुपयांचा नफा अपेक्षित होता मात्र एक लाखांच्या खर्चाबरोबरच शेतकऱ्याचे कष्ट आणि खर्ची पडलेली वेळ वाया गेली आहे. या बोगस बियांनामुळे सूचित घरत या तरुण शेतकऱ्याला जवळपास 6 लाखांचा फटका बसला आहे.
◾मी नामवंत असलेल्या सिजंटा कंपनीचे टॉमेटो बियाणे घेऊन त्याची लागवड केली होती. मात्र रोपांची उत्तम प्रकारे वाढ झाल्यानंतर त्याला फळधारणा झालीच नाही. या बोगस बियांनामुळे माझे खूप मोठे नुकसान झाले असून वेळही वाया गेला आहे. त्यामुले कंपनीने याबाबत मला पूर्ण नुकसानभरपाई द्यावी.
— सूचित घरत शेतकरी ओंदे,विक्रमगड
◾विक्रमगड तालुक्यातील ओंदे येथील शेतकरी सूचित घरत यांना आमच्या कंपणीने बियाणे दिले आहे. आम्ही सदर टॉमेटो पिकाची पाहणी केली असून पुढे अहवाल पाठविला आहे. नुकसानभरपाई देण्याबाबत आमचे वरिष्ठांशी बोलणे चालू आहे.
— शिरिश शिंदे, सिजेंटा प्रतिनिधी