◾ पश्चिम रेल्वेवरील नायगाव आणि भाईंदर खाडीवरील पूल तोडण्याचे काम सुरू
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
विरार: स्वातंत्र्या पूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला 153 वर्षांपूर्वीचा नायगाव आणि भाईंदर खाडीवरील जुना रेल्वे पूल तोडण्यास काल पासून सुरुवात झाली आहे. या पुलावरून हलक्या वाहनांना प्रवेश द्यावा अशी मागणी करण्यात येत होती परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. जवळपास चार पिड्यांशी भावनिक नाते असलेल्या हा पूल तोडण्यात येत असल्याने ब्रिटिशकालीन पुलाचा अध्याय पूर्ण झाला आहे.
ज्या काळी दळणवळणाची होती त्या काळी ब्रिटिशांनी नायगाव आणि भाईंदर खाडीवर पूल बांधला होता या पूल यावरून 12 एप्रिल 1867 साली पहिली रेल्वे विरार ते बॉम्बे बैकबे या दरम्यान धावली होती. त्यावेळी विरार ते बॉम्बे बैकबे यादरम्यानच्या स्थानकाची नवे हि मज्जेशीर होती. यामध्ये नाला , बेसिन,पंजे,बोरवला , पहादि , अंडारू, सांताक्रुज, बंडोरा, माहिम, दादुर, ग्रांट रोड आणि बॉम्बे बैकबे या समावेश होता. त्यानंतर या स्थानकाची नावे बदलण्यात आली या मध्ये नालासोपारा, वसई रोड, भाइंदर बोरीवली, मालाड, अंधेऱी, बांद्रा, दादर यांचा समावेश आहे . साधारण पणे 1989 च्या दरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या पूल मुळे जवळपास पिड्यांशी नाते सांगणारा हा पूल विस्मृतीत गेला .
1990 पासून एकाकी उभा असलेल्या पुलाची अखेरची घटका मोजत उभा होता. परंतु अखेर काळ पासून हा पूल तोडण्यास सुरुवात झाली आहे. नायगाव आणि पाणजू दरम्यानच्या पुलाचा लिलाव झाल्याने ठेकेदाराने हा पूल तोडण्यास सुरुवात केली आहे सुरुवातीला पुलाच्या पिलरला हात न लावता पुलाच्या वरचे गॅस कटरच्या साहाय्याने तोडण्यास सुरुवात झाली आहे. तर भाईंदरकडच्या पुलाचा लिलाव बाकी असून तो झाल्या नंतर तो पूल हि तोडण्यात येणार आहे. असे म्हणतात कि या दोन्ही पुलाच्या पिलर मध्ये प्रमाणात शिसे आणि तांबे ओतण्यात आले होते. त्याची किंमत आज करोडो रुपयांची आहे. या पुलाचा सर्वात जास्त उपयोग हा पाणजूच्या लोकांना जा ये करण्यासाठी होत होता.