◾ 30 वर्षेनंतर प्रथमच शाळा बंद आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होतेय स्पर्धा रद्द
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
विरार: वसई तालुका कला क्रीडा महोत्सव हा गेल्या 30 वर्षा पासून वसई मध्ये सुरु असून या मोहोत्सवातून राज्याला आणि देशाला बऱ्यापैकी खेळाडू पुरविले जात आहेत जवळपास 55 हजाराच्यावर स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत असतात डिसेम्बरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या या स्पर्धा काही काळा साठी पुढे ढकलणारी असल्याचे संकेत मिळत असून यासाठी लवकरच महोत्सव समितीची बैठक होणार असल्याचे समजते. महोत्सव सुरु झाल्या पासून प्रथमच हा महोत्सव 30 वर्षानंतर पुढे ढकलण्यात येणार आहे जिल्हा क्रीडा स्पर्धे पाठोपाठ वसई तालुका कला क्रीडा महोत्सवालाही कोरोनाचा फटका बसला काही.
कोरोनाच्या मुले अनेक खेळांच्या स्पर्धाना फटका बसला असून काही स्पर्धा रद्द करण्यात आल्या तर काही पुढे ढकलण्यात आल्या त्यातच वसई विरार महानगरपालिका झाल्यानंतर 2010 पासून या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धेची सुरुवातसाधारण पणे जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुब्रोतो फुटबॉल स्पर्धेने पावसाळी स्पर्धेला सुरुवात होऊन हि स्पर्धा डिसेम्बरच्या पहिल्या आठवड्यात संपतात. 11,14, 17 आणि १९ वर्षे वयोगटात हि स्पर्धा खेळविली जाते. इनडोअर आणि आउट डोअर अश्या 43 प्रकारच्या स्पर्धा खेळविल्या जात असतात . 351 शाळा आणि जवळपास 20 हजार स्पर्धक सहभागी होतात यास्पर्ध्येतून राज्य आणि राष्ट्रीय स्पर्ध्येसाठी खेळाडूंची निवड केली जाते तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेत खेळल्याने 10 वि आणि 12 विच्या विद्यार्थाना जिल्हास्तरावर 5, विभागस्तरावर 10, राज्यस्तरावर 15 आणि राष्ट्रीय स्तरावर 20 गुण दिले जातात आणि हे गुण शाळांत आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्रात समाविष्ट करण्यात येतात परंतु यावर्षी स्पर्धाच होण्याची श्यक्यता कमी असल्याने खेळाडू या गुणांना आणि राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेला मुकणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
वसई तालुका कला क्रीडा महोत्सव सुरु झाल्यापासून या मोहोत्सवात अनेक विगने आली परंतु हा महोत्सव कधी थांबला नाही उलट या मोहोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत राहिला आहे 5 हजार स्पर्धकांचा सहभाग असलेल्या या महोत्सवाने 55 हजाराचा टप्पा पार केला असताना यावेळी मात्र शाळा बंद असल्याने तसेच कोरोनामुळे 26 डिसेम्बर पासून सुरु होणार 31 वा कला क्रीडा महोत्सव पुढे ढकलण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून त्यासाठी लवकरच महोत्सव समितीची बैठक बोलावण्यात येणार असल्याचे समजते याबाबत महोत्सव समितीचे सचिव प्रकाश वनमाळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि याबाबत लवकरच बैठक बोलावण्यात येणार असून त्यात याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.