◾अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी; सुसाट वेगाने चालणाऱ्या वाहनांन मुळे अपघाताचे प्रमाण वाढले
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: चिल्हार बोईसर रस्त्यावर शनिवारी (ता.21)सकाळी दहा वाजताच्या सुमारास वेळगावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. यात दुचाकीस्वार साईनाथ भुयाळ (वय.31)गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी दुचाकीस्वार महामार्गावरील चिल्हार- आवंढाणी ग्रामपंचायत हद्दीतील बेलपाड्याचा रहिवासी आहे.
चिल्हार बोईसर रस्त्यावर सुसाट वेगाने चालणाऱ्या वाहनांन मुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दोन आठवड्यापूर्वी (ता.05)चिल्हार बोईसर रस्त्यावर गुंदले गावच्या हद्दीतील वाघोबा खिंडीत दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रेखा केणी नामक महिला ठार झाली होती. तर रमेश केणी नावाचा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता.
स्थानिकांनी खोडा घातल्याने बोईसर चिल्हार रस्त्यांचे कामची गेल्या दोन वर्षांपूर्वी रखडपट्टी सुरू आहे. अनेक भागात चौपदरीकरणाचे कामाला विरोध झाल्याने काम पुर्ण होऊ शकले नाही. यामुळे अचानक संपणाऱ्या व अपुर्ण राहणाऱ्या रस्त्यामुळे अपघात देखील घडत आहेत. यामुळे संपूर्ण काम तातडीने पुर्ण व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देवून रखडपट्टी झालेल्या कामाबाबत तोडगा काढण्याची मागणी नागरिकांन कडून केली जात आहे.