पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
पालघर: पालघर मधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी सोलार बोटीची निर्मिती केली आहे. सौरऊर्जा बोट ही पालघर मध्ये चर्चेचा विषय बनली असून भविष्यात ही बोट मोठी फायदेशीर ठरणार आहे असा विश्वास औद्योगिक संस्थेचा आहे.
पालघर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारी बोट एक आविष्कार ठरली आहे. ही बोट इंधनाची बचत करणारी असून भविष्यात या बोटीचा उपयोग जास्तीत जास्त होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. गेल्या ९ ते ८ महिन्यांपूर्वी भंगारातून व्हॅन विकत घेऊन सौर ऊर्जेवर चालणारी व्हॅन तयार केली होती. त्याच विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वीजतंत्री व इतर व्यवसायाच्या प्रशिक्षणकार्त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी बोट बवली आहे.
सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बोटीसाठी आवश्यक निधी आजी-माजी प्रशिक्षणकर्त्यांनी, संस्थेचे प्राचार्य एस. एन. परदेशी, निर्देशक जे. आर. पाटील, डी. आर. भारमल, के.बी. आहेर, केतन किणी यांनी उभा केला. या बोटीसाठी ९० हजारा रुपये इतका खर्च आला आहे. जिल्ह्यात पर्यटनाला तसेच मासेमारी व्यवसायला भरपूर वाव आहे. त्यामुळे भविष्यात सोलर बोटीचा वापर छोट्या मासेमारी व बोटिंगसाठी करता येतू शकतो. सौर ऊर्जेवर चालणारी बोट बनवण्यासाठी संस्थचे निर्देशक प्रमोद पाटील, निजाई, निलेश धोंडी, डी. व्ही. गवस, रोशन संखे यांनी सहकार्य केले.