पालघर दर्पण : प्रतिनिधी
मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर काही महिन्यांपूर्वी बीएमसी ने तोडफोड केली होती. तसेच महापालिकेद्वारे नोटिसद देखील देण्यात आली होती. मात्र ही नोटीस हायकोर्टाने रद्द केली आहे.
कंगना रनौतचे मुंबई येथील कार्यालय बेकायदेशीर ठिकाणी बांधलेले आहे असे बीएमसी कडून सांगण्यात आले होते. व तशी नोटीस देखील पाठवण्यात आली. या दरम्यान कंगनाने हायकोर्टात याचिका दाखल केल्यावर तिला कार्यालय ताब्यात घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याच बरोबर कंगनाने पुढच्या तीन महिन्यात २ कोटी नुकसान भरपाईची दावा केला होता. त्याबाबाबत स्वतंत्र व्यल्युअरची नेमणूक करावी त्याचा खर्च कंगनाने करावा व त्या नंतर नुकसान भरपाईची जी कारवाई असेल ती करण्यात यावी असे हायकोर्टाने नोंदवले आहे.
हायकोर्टाच्या निर्णयावर कंगनाने आनंद व्यक्त केला असून ज्यांनी तिला हिंमत दिली त्यांचे तिने आभार मानले. तसेच जे तिच्या तुटलेल्या स्वप्नांवर हसले त्याचे देखील तिने आभार मानले हे आभार मानण्याचे कारण की, आपण एक खलनायकाची भूमिका स्वीकारता म्हणून मी एक हिरो असू शकते अस कंगनाने म्हंटल आहे.