पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. येत्या काळात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना लवकरात लवकर पूर्ण करणार असे त्यांनी सांगितले आहे.
पोलिसांच्या घरांचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असे संगीतले. पुढील ४ वर्षात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधण्याचा नियोजन करीत आहोत असे सांगितले. त्याच बरोबर महिलांच्या सुरक्षतेसाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा आणण्याचे काम सुरू केले आहे पण करोनामुळे काम थांबले आहे. ड्रायव्हर ड्राफ तयार आहे. येत्या अधिवेशनात हा मसुदा विधीमंडळात मांडू आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळेल असा हा कायदा असेल अशी माहिती त्यांनी दिली.