◾ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराला बसणार चाप
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: गावाचा सेवक म्हणून शासनाने नियुक्त केलेले ग्रामसेवक हे आता मालक बनले असून पालघर जिल्ह्यात तर ग्रामसेवकांची मनमानी वाढली आहे. याचा परिणाम गावाच्या विकासावर होत असून ग्रामविकास विभागाच्या शासन परिपत्रका नुसार ग्रामपंचायतीच्या मासिक सभा व ग्रामसभेचे इतिवृत्त गटविकास यांच्या कडे सादर केले देखील जात नाही. याबाबत आता विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला असल्याने हा महत्त्वाचा विषय समोर आला आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधे ग्रामविकास विभागाच्या शासन परिपत्रका नुसार ग्रामपंचायतीच्या मासिक सभा व ग्रामसभेचे इतिवृत्त गटविकास अधिकाऱ्यांन कडे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी वेळेत पाठवितात का? तसेच ते वेळेत सादर न करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली इत्यादि तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषदेत आ.विनायकराव मेटे यांनी अनेक प्रश्न विचारले असून अनेक ग्रामपंचायतीच्या कारभाराचे खरे वास्तव समोर येणार आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव यांनी 24 नोव्हेबंर ,2020 ला पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून आ.मेटे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न क्र.6035 द्वारे विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे व सविस्तर माहिती मागविली आहे तर पालघर जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी 25 नोव्हेबर ला जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांकडून उपरोक्त प्रश्नांची भागावर उत्तरे, पूरक टिप्पणीसह त्वरित मेल द्वारे तात्काळ कार्यालयास पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
◾ग्रामपंचायत मध्ये घोटाळा करण्यासाठी माहीर असलेले ग्रामविकास अधिकारी हे आपल्या सोईनुसार ग्रामसभा व मासिक सभेचे इतिवृत्त गटविकास अधिकारी यांच्या कडे सभे नंतर जमा करत नाही. इतिवृत्त लिहताना देखील काही प्रमाणात मोकळ्या जागा सोडल्या जातात जेणेकरून आयत्यावेळी एखादे बोगस केलेले काम त्यामध्ये लिहता येऊ शकते. पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी यांच्या विषयी शेकडो तक्रारी दाखल झाल्या मात्र राजकीय पाठबळामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई मात्र होत नसल्याचा आरोप नागरिकांन कडून वारंवार केला जात आहे.
◾पालघर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश ग्रामपंचायत कर्मचा-यांवर अन्याय होत असून तारांकित प्रश्नाच्या उत्तरा कड़े सर्वांचे लक्ष लागले आहे.
–संतोष मराठे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनापं