■ रजनीकांत राजकारणात उतरणार; ३१ डिसेंबरला करणार मोठी घोषणा
पालघर दर्पण: प्रतिनिधी
मुंबई: अभिनेता रजनीकांत हे आता राजकारणात उतरणार असून त्यानी तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१ साठी आपल्या राजकीय एन्ट्री बाबत मोठी घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी स्वतः राजकारणात येण्याच सांगितलं असून त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा ३१ डिसेंबर ला केली जाणार आहे.
रजनीकांत गेल्या २ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. परंतु अधिकृतरित्या त्यांनी राजकारणात प्रवेश केला नाही. मात्र येत्या नवीन वर्षात रजनीकांत राजकारणात एन्ट्री करणार असून त्यांची नेमकी भूमिका काय असणार अशी उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागलेली आहे. गेल्या वर्षी कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याची ईच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता हे दोघे राजकारणात येऊन इनिंग खेळणार असल्याच्या चर्चा तामिळनाडू पहायला मिळत आहेत.