■करोना लसीबाबत पंतप्रधानांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
मुंबई: आज ४ डिसेंबर रोजी करोना लसीबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधण्यासाठी बैठक घेतली. तज्ञांच्या माहितीनुसार पुढील काही आठवड्यात करोना लस तयार होईल असे या बैठकीत मोदींनी सांगितले. त्याचबरोबर करोना पासून बचाव करणाऱ्या लसीला नवीन वर्षात परवानगी मिळेल असे ३ डिसेंबर रोजी AIIMS डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले होते.
पंतप्रधानांनी लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांसोबत बातचीत केली असून यशाबाबत खात्री असल्याचे सांगितले. तसेच भटरता लस चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहे आणि तज्ञांच्या मते लसीकरण फार दूर नाही. वैज्ञानिकांनी ग्रीन सिग्नल देताच भारतात लसीकरण अभियान सुरू होईल असे पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत सांगितले. करोना लस ही सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, फ्रण्डलाईन कर्मचारी, वयोवृद्ध व्यक्ती व गंभीर आजारी असलेल्या लोकांना लस दिली जाणार असल्याचे सांगितले तसेच या लासीची किंमत अद्याप सांगितली नसून केंद्र व राज्य सरकार लसीच्या खर्चावर चर्चा करत असल्याचे सांगितले आहे.