पालघर दर्पण: प्रतिनिधी
मुंबई: करोना महामारीे संपूर्ण देशभारत व्यापली असून इतर अनेक आजारांनीही नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णालयात रक्ताची टंचाई जाणवत असल्याने जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान कराहावे असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
राज्यातील रक्तपेढयांमध्ये रक्तसाठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूर्वी महाविद्यालये व कोर्पोरेट सेक्टर हे दोन रक्त संकलनासाठी महत्वाचे स्रोत होते. मात्र सध्या महामारीमुळे महाविद्यालये बंद असल्याने तसेच मोठं मोठे कॉर्पोरेट सेक्टर विभाग वर्क फ्रॉम होम काम करत असल्याने रक्त संकलानामध्ये अडचणी येत आहेत.
सध्या ची परिस्थिती पाहता येत्या काळात रक्ताचा साठा कमी पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. रक्ताची कमतरता भासू नये म्हणून राज्यातील धार्मिक, राजकीय, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी सुरक्षिता ठेवून छोट्या छोटी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. तसेच नजीकच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.