◾टाटा सन्स कंपनी मोबाईल पार्ट्स बनवण्याच्या तयारीत
पालघर दर्पण: प्रतिनिधी
मुंबई: भारतात करोना चीनमधून कारोनाचा फैलाव झाल्या नंतर काही चिनी अँप भारतात बॅन करण्यात आले. मात्र मोबाईलचे पार्ट्स अद्यापही चिनी कंपन्यांकडून मागवावे लागतात. भारतात मोबाईल प्रॉडक्शनच्या अनेक कंपन्या असल्या तरीही चीनवरून मोबाईल पार्ट्स मागवण्या खेरीस पर्याय नव्हता. मात्र आता चीन हा पर्याय हाणून टाटा सन्स कंपनीने भारतात मोबाईल पार्ट्स प्रोडक्शनचा प्लांट सुरू कारणार असल्याचे सांगितले आहे.
टाटा सन्स कंपनी भारतात तामिळनाडूमध्ये मोबाईल पार्ट्स प्रोडक्शनचा प्लांट सुरू करण्याची योजना करत आहे. अनेक विदेशी कंपन्या चीन बाहेरील मोबाईल प्रोडक्शन कंपन्यांसाठी संधीच्या शोधत आहेत. या कंपन्यांसोबत एकत्र येऊन भारतात मोबाईल पार्ट्सची निर्मिती केली जावी अशी योजना टाटा सन्स ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांची आहे.
■ कशाप्रकारे होणार मोबाईल पटर्स बनवण्याची सुरुवात.
तामिळनाडूतील टाटा प्लांटमध्ये विदेशातून अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्लांटमध्ये सर्वप्रथम महागड्या आयफोनचे पार्ट बनवले जातील. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि जपानच्या ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर्स सोबत भागीदारी केली जाणार आहे. असे चंद्रशेखरन यांनी सांगितले.