■ ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती दिशाभूल करू शकतात माहिती व प्रसारण मंत्रालयाचे म्हणणे
पालघर दर्पण: प्रतिनिधी
मुंबई: सध्या लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मोबाईलगेम तसेच ऑनलाईन गेमचे वेड आहे असल्याचे दिसून येते. त्यातच आता ऑनलाईन गेम खेळून पैसे व रोजगार कमवण्यासाठीचा दावा करणाऱ्या जाहिरातींमुळे अनेक जण गेमच्या आहारी जाऊ लागले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच ऑनलाईन गेमिंगच्या दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने चिंता व्यक्त केली असून आशा जाहिराती दिशाभूल करु शकतील असे सांगितले आहे. त्यामुळे सर्व खासगी वाहिन्यांनी निर्देशनांचे पालन करावे असे सांगितले.
ऑनलाईन गेमिंग सदर्भातील जाहिराती दाखवण्यात येत असेल तर सोबत डिस्क्लेमर देण्याचंही निर्देश मंत्रालयानं दिलं आहे. संबंधित खेळामध्ये आथिर्क जोखीम आहे आणि यात आपल्या जोखीमवर भाग घ्यावा तसेच १८ वर्षाखालील मुलांनी या खेळात भाग घेऊ असे या डिस्क्लेमरमध्ये नमूद करावं असं मंत्रालयानं सांगितलं आहे.