पालघर दर्पण, प्रतिनिधी
मुंबई: केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू केल आहे. सुरू असलेल्या आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. ९ डिसेंबर रोजी सरकार कायद्यांबाबदत मोठा निर्णय घेणार असल्याची सगळीकडे चर्चा आहे. ९ तारखेला दुपारी १२ वाजता सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे.
काल ५ डिसेंबर ला झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ९ डिसेंबर ला चर्चा केली जाणार आहे. यामध्ये केंद्र सरकार योग्य निर्णय घेत नाही तो पर्यंत आंदोल मागे न घेण्याचा ईशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. कालच्या चर्चेत दोन्ही पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण दिसून आले. ८ डिसेंबर ला शेतकरी संघटनांनी भारत बंदचं आवाहन केलं आहे. काल झालेल्या चर्चेत शतकऱ्यांनी बराच वेळ मौन धारण केले होते.
सरकार कडून एकाच मुद्द्यावर सारखी चर्चा होत असल्याने शेतकरी हैराण झाले होते. त्यांनी नाराजी व्यक्त करत सरकारी फाईल्सच्या मागे होय आणि नाही असे लिहून त्या फाईल्स चर्चेत संवाद साधण्यासाठी वापरल्या होत्या. साधारण २५ ते ३० मिनिटांचा अवधी शेतकऱ्यांनी आशाच प्रकारे फाईल्सच्या सहाय्याने चर्चेत संवाद साधला. मात्र कालच्या चर्चेत काहीच तोडगा निघाला नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. मागण्या मान्य न झाल्याचं आंदोलच सुरू ठेवू असा ईशारा त्यांनी दिला आहे.