■ शेकातरी प्रेम मुळात नकली; भाजप प्रवक्ते केशव उपाध्येय यांचं ट्विट
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
मुंबई: दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेत कोणाही तोडगा न निघाल्यामुळे शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर भारत बंदचे आव्हाहन केले. या भारत बंद ला शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षानी पाठींबा दिला आहे. यायाबाबत भाजप प्रवक्ते यांनी केशव उपाध्येय यांनी ट्विट केले.
दिल्लीतील सीमेवर सध्या शेकऱ्यांचे आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा १२ वा दिवस आहे. मात्र अद्यापही निर्णय न शेकातरी वैतागलेले आहेत. दोन दिवसा पूर्वीच्या बैठकीत कोणाही तोडगा निघाला नसल्याने शेकऱ्यांनी ८ डिसेंबर ला भारत बंदचे आवाहन केलं. या सगळ्याचा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी पाठींबा दिला आहे. मात्र या सगळ्यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्येय यांनी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांचं शेतकरी प्रेम नकली आहे. असे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
त्याच बरोबर मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अजूनही पुरेशी मदत दिली नाही.व दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. ना शेतकऱ्यांना कोणती मदत राज्य सरकारने करोना काळात केली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात खासगीकरण सुरू झालं. शरद पवार कृषिमंत्री असताना पाठवलेले पत्र आज समोर आहे ज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी खाजगीकर्नल चालना देण्याबाबत त्यांनी लिहिले आहे. असे केशव उपाध्येय यांनी ट्विट करत विरोधी पक्षाच्या टोला दिला.