शरद पवारांची जुनी पत्र व्हायरल; भाजप नेत्यांनी केल्या टीका.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
मुंबई : भारत बंद ला शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस ने पाठींबा दिला त्या मुळे भाजप नेत्यांनी त्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. व शरद पवार यांच्या कृषिमंत्री कार्यकाळात त्यांनी लिहिलेले जुने पत्र व्हायर केले. त्या पत्रावर राष्ट्रवादी कडून खुलासा करण्यात आला आहे.
दिल्लीत सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सूरु असून उद्या ८ डिसेंबर रोजी भारत बंद असे आव्हान शेतकऱ्यांनी केले आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नसल्याने शेतकरी वैतागले असल्याने भारत बंद चे आव्हान केले गेले. भारत बंद ला शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी पाठींबा दिला. तसेच शेतकऱ्यांनी सुरु केलेली आंदोलनाकडे भाजप सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे नाहीतर ते दिल्ली पुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशभर होईल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
यानंतर भाजप नेत्यांनी यावर ट्विटरवर टीका व्यक्त करून जेव्हा पवार कृषी मंत्री पदाचा कार्यभार सांभाळत होते तेव्हा त्यांनी कृषि कायद्यात मोठ्या बदलाची गरज असे व्यक्त करत दिल्लीतील मुख्यमंत्री शिला शिक्षित यांना पत्र लिहिले होते. अशी टीका भाजप नेत्यांनी पवारांवर ट्विटरच्या माध्यमातून केल्या. मात्र या पत्राचा खुलासा राष्ट्रवादीने केला असून एक कृषिमंत्री म्हणून शरद पवारांचे राज्य कृषी मंडळामध्ये व्यापक सहमती निर्माण करण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सल्ले मागितले होते. एपीएमसी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे फायदे अनेक राज्यांना समजावले होते. अनेक सरकार अंमलबजावणीसाठी पुढे आली होती. असेस सांगितले.