◾सुशिक्षित बेरोजगारांना स्थानिक ठिकाणीच हवे आहे काम
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: आदिवासी बहुल असलेल्या विक्रमगड तालुक्यांचा खुंटलेला विकास आणि गरिबी,दारिद्रय,अज्ञान, सुशिक्षितांची बेरोजगारी दुर करण्यासाठी या ग्रामीण तालुक्याच्या भागात शासनाने औद्योगीक वसाहतीसाठी एमआयडीसीची परवानगी द्यावी,अशी मागणी बेरोजगारांन कडुन कित्येक वर्षा पासुन केली जात आहे. सुशिक्षित बेरोजगारांना कामासाठी इतरत्र जावे लागत असून आपल्या भागातच काम मिळावे अशी अपेक्षा बेरोजगारांन कडून केली जात आहे.
विक्रमगड हा आदिवासी लोकवस्तीचा तालुका असुन या भागातील विकास गेल्या अनेक वर्षापासुन खुंटलेला आहे. या तालुक्यात मोठा रोजगार नसल्याने गरिबी त्यामुळे येणारे दारिद्रय,बेरोजगारी काम नसल्याने कुंटुबावर येणारी उपासमारी आदिविध समस्या या ठिकाणी या लोकांच्या जन्मापासुनच उपजत पाटयाला पुजल्या आहेत. या ग्रामीण तालुक्यात बेरोेजगारीचे प्रमाण मोठया प्रमाणावर असुन कामाच्या शोधात अनेक कुंटुबे वेगवेळया शहरांच्या ठिकाणी आपल्य मुला बाळासहीत स्थलांतरीत होत आसतात. पावसाळयातील चार
महिन्याचा शेतीचा हंगाम सोडला तर इतर आठ महिन्यांच्या कालावधीत शेतक-यांना व मजुरांच्या हाताला काम देणार असा छोटा व मोठा कोणताही
उद्योग,औद्योगीक क्षेत्र,कंपन्या नाहीत. शिवाय या भागात पुरेसी रब्बी पिक होत नसल्याने व शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची योग्यरित्या अंमलबजावणी होत नसल्याने व रोजगार हमीच्या कामांवरील मजुरी मजुरांना परवड नसल्याने येथील कुंटुबाना कामाच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करावे लागते.
गरिब कुंटुबातील मुलांची अशिक्षितपणामुळे अनेकदा फसगतही होतांना दिसते. त्याशिवाय स्थलांतरीत कुंटुबातील मुलांच्या शिक्षणावरही मोठया प्रमाणावर परिणाम होतांना दिसुन येतो. अशा परिस्थितीत जर शासनाने येथे एमआयडिसीच्या माध्यमातुन उत्पादित होणाऱ्या कच्च्या मालप्रमाणे औद्योगीक वसाहतींना परवानगी दिल्यास,तसेच बेरोजगारांना प्रशिक्षण दिले तर बहुसंख्य बेरोजगार तरुण तसेच येथील बांधवाच्या हाताला स्थानिक पातळीवरच काम उपलब्ध होवुन येथील बेरोजगारी,दारिद्रय,अशिक्षितपणा दुर होण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे शासनाचे या ग्रामीण भागात विकासाच्या दृष्टीकोण समोर ठेवुन गेल्या अनेक वर्षापासुन रोजगारासाठी भटंकती करणा-या गरिबांना स्थानिक पातळीवर रोजगार देण्यासाठी येथे एमआयडीसी सुरु करावी अशी मागणी आता नविन जिल्हयांच्या पार्शवभुमीवर जोर धरु लागली आहे.
◾ ठाणे जिल्हयांचे विभाजन होवुन पालघर या नविन जिल्हात त्यामध्ये विक्रमगड,जव्हार,मोखाडा हे तिन तालुके अती दुर्गम मागास भागातील असल्याने शासनाला ख-या आर्थाने येथे विकास साधावयाचा असेल तर या भागात नवीन औद्योग सुरु करायला हवे आहेत व त्याप्रमाणे शासनाने पावले उचलावी.
— स्वप्नील पाटील, सुशिक्षित बेरोजगार विक्रमगड
◾विक्रमगड तालुक्यात उच्चशिक्षित असे अनेक तरुण बेरोजगार आहेत व त्यांना स्थानिक पातळीवर काम हवे आहे. त्या मुळे या भागात नवीन औद्योग यायला हवे आहेत.
— ज्ञानेश्वर जाधव, सुशीक्षित बेरोजगार विक्रमगड
◾पालघर जिल्हात दळण-वळणाच्या सुविधा मोठया प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे या भागासाठी रोजगार देणारे मोठ व्यासपिठ म्हणुन एमआयडीसीची सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे.
— अनिकेत सांबरे, सुशीक्षित बेरोजगार विक्रमगड