◾आंदोलनाचा १४ व दिवस; कालच्या बैठीकी देखील तोडगा नाही.
पालघर दर्पण: प्रतिनिधी
मुंबई: दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे कृषीविधेयकां विरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आजचा १४ वा दिवस असून अद्यापही तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांकडून कृषी कायदे बंद करण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य न केल्यामुळे आंदोलन मागे न घेण्याचा निर्णयावर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा अंतर्गत कॅबिनेट बैठक घेतली गेली असल्याचे समोर आले.
शेतकऱ्यांसाठी कॅबिनेट बैठक ही महत्त्वाची मानली जात असून व्हिडीओ कॉन्फ्ररन्सच्या सहाय्याने कॅबिनेट बैठक घेतली गेली. या मध्ये सरकारने शेतकऱ्यांना प्रस्ताव पाठवला असून या प्रस्तावाच वाचन केल्यानंतरच आंदोलनासंबंधीत पुढील निर्णय घेतला जाईल असे शेतकरी नेत्यांनी सांगितले आहे.