■संतप्त शेतकऱ्यांचा संपूर्ण देशभरात धरणे आंदोलनाचा ईशारा
पालघर दर्पण: प्रतिनिधी
मुंबई: सरकारने कृषी कायद्या बाबत पाठवलेला प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला असून आंदोलन सुरूच आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा १५ वा दिवस असून आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा दिला आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत सरकारने काल ९ डिसेंबर रोजी १३ शेतकरी संघटनांना प्रस्ताव पाठवला होता. मात्र तो प्रस्ताव फेटाळला असून त्यात कोणतेच नवे मुद्दे नसल्याने व केंद्राने शेतकऱ्यांच्या मागच्या बैठकीत मांडलेले मुद्दे आताच्या सुद्धा म्हणजे ९ डिसेंबरला दिलेल्या प्रस्तावात असल्याने हा प्रस्ताव फेटाळला आहे असे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे संतापून आता आंदोल अधिक तीव्र करण्यात येईल असे देखील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
१४ डिसेंबर रोजी देशभरात धरणे आंदोलन करण्यात येईल असे शेतकऱ्यांनी ईशारा दिला आहे. या आंदोलनाला भाजप मंत्र्यांना घेराव घालण्यात येईल व १२ डिसेंबरला जयपूर दिल्ली हायवे आणि दिल्ली-आग्रा हायवे जाम करण्यात येणार असल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले आहे. यादरम्यान दिल्लीकडे जाणारे सर्व रस्ते अडवण्यात येतील व जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत आंदोल सुरूच राहील असे सांगण्यात येत आहे.