पालघर दर्पण : प्रतिनिधी
वसई: करोना झाल्याने उपचारासाठी महिला वसईतील नामांकित रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यानेच महिलेचा वियनभंग केला असून फोटो काढून ब्लॅकमेल करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वसईत राहणारी महिला करोना पॉझिटिव्ह आल्याने तिला वसईतील नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयातील एक कर्मचाऱ्याने महिलांवर उपचार करत असताना तसेच महिला बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्या अंगावरचे कपडे काढून त्या अवस्थेत फोटो काढले. त्यानंतर हे फोटो त्याच महिलेला व्हॉट्सअँप द्वारे पाठवले असून तिला ब्लॅकमेल केले. महिले जवळ १० लाख रुपये मागितले असून ते न दिल्यास तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जातील असे ब्लॅकमेल कर्मचाऱ्याने महिलेला केले होते.
यादरम्यान महिलेने सरळ माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच बरोबर याआधी असा प्रकार आरोपीने केला आहे का याचा तपास पोलिस करत आहेत.