◾पाठलाग सुरू असताना महामार्गालगतच्या कुडे गावात टेम्पो सोडून दारू माफिया फरार; पीक अप टेम्पोत सापडले दारू तस्कर धीरज वसंत पाटील यांचे आधारकार्ड
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: मुंबई अहमदाबाद महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी (ता.11)केलेल्या कारवाईत दमण बनावटीच्या मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.बेकायदा वाहतूक केला जाणारा सुमारे साडे अकरा लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. कुख्यात दारू तस्कर धीरज वसंत पाटील याचा या तस्करीत हात असल्याची माहिती पुढे येत आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्ट्यांमध्ये पालघर जिल्ह्यालगतच्या केंद्रशाशीत प्रदेशातुन मद्याची तस्करी होते. केंद्र शासित प्रदेशातून होणारी मद्य तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दिवस रात्र जिल्हात गस्त सुरू आहे. शुक्रवारी सकाळी गस्त पथकाला महामार्गावरील एक नंबर प्लेट नसलेली पिकअप मुंबई च्या दिशेने जात असल्याची दिसुन आली. गस्ती पथकाला त्यावर संशय आल्याने पीक अप चा पाठलाग सुरू केला. परंतु पीक अप चालकाला गाडीचा पाठलाग सुरू असल्याचे समजताच तो वेगाने मुंबई च्या दिशेने पळू लागला होता. त्यानंतर पीक अप चालकाला संधी मिळताच त्याने कुडे गावातील रस्त्यावर गाडी वळवली आणि कुडे गावातील राम मंदिरासमोर पीक अप सोडून पळून गेला.
पीक अपची वाहनाची झडती घेतली असता रॉयल स्टॅग , आयबी,ब्लेंडर्स प्राईड,मॅकडोल नं.1,सिगनेचर,ब्लॅक अँड व्हाईट,व्हॅट 69 या ब्रॅण्डचे 62 बॉक्स आणि किंग फिशर बियरच्या 10 बॉक्स असा एकूण अंदाजे 11 लाख 27 हजार 360 किमतीचा 72 बॉक्स मद्याचा साठा आढळून आला.पीक अप मध्ये सराईत मद्य तस्कर धीरज वसंत पाटील याचे रंगीत आधारकार्डाची प्रत मिळाली,धीरज वर दारू तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ विजय भुकन,उपअधिक्षक एम.एच.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क निरीक्षक शैलेश शिंदे, दुय्यम निरीक्षक रामदास काटकर,यु.आर. गायकवाड,जवान बी. बी.कराड,आर.एम.राठोड,एस.एस.पवार,अनिल पाटील यांच्या पथकाने केली.