पालघर दर्पण,प्रतिनिधी
कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु केले असून आज या आंदोलनाचा १७ वा दिवस आहे. आंदोलनात यादरम्यान शेतकऱ्यांशी केंद्र सरकारच्या अनेक बैठक झाल्या तरी देखील शेकऱ्यांच्या समस्येवर तोडगा निघाला नाही. कृषी कायदे रद्द न केल्याने आंदोलन अधिक तीव्र केल्याचा इशारा शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. कृषी कायदा रद्द या मागणीवर शेतकरी ठाम असून उद्या पासून उपोषणाला बसणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
कालच्या व्याख्यानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते कि, कृषी कायदा शेतकऱ्यांच्या फायद्यायसाठी आहे. मात्र असे असले तरीही शेतकऱ्यांना हा कायदा मान्य नाही. त्याच बरोबर अनेक बैठकी नंतर देखीलही तोडगा निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आता उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. रविवारी (आज) असंख्य संख्येने ११ वाजता शहापूर येथून जयपूर-दिल्ली महामार्गावरील वाहनांना रोखण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टर आंदोलन करण्यात येईल असे शेतकरी नेता कमल सिंह पन्नू यांनी शनिवारी सांगितले होते. तसेच सोमवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता उपोषणाला सुरुवात करणार असल्याची माहिती दिली आहे. या आंदोलनात शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी आणि अध्यक्ष स्टेजवर १४ तारखेला उपोषणासाठी बसतील असे देखील कमल प्रीत पन्नू यांनी सांगितले आहे.
शेतकरी कृषी कायदा रद्द मागणीवर ठाम असून सरकार सोबत चर्चा करण्यासाठी तयार आहेत. मात्र लागू केलेलं नवीन तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी ही चर्चा केली जाईल. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता यावर सरकारची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.