पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा, कारवाईची मागणी.
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील आवंढाणी गावच्या हद्दीत गुजरात मार्गिकेवर शनिवारी पहाटे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गायीचा मृत्यू झाला होता.12 डिसेंबर रोजी शनिवारी पहाटे पासून मृत गाय महामार्गावर पडून होती. अठरा तासानंतर रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास मृत गाय रस्त्यावरून हटविण्यात आली.अपघाताची शक्यता असताना मृत गाय महामार्गावर अठरा तास पडून राहिल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि गोभक्तांनी ठेकेदार कंपनी विरोधात संताप व्यक्त केला आहे. अज्ञान वाहनाने दिलेल्या धडकेत मृत झालेली गाय रस्त्यावर पडल्यामुळे अपघाताची शक्यता होती,तसेच गोमातेच्या देहाची विटंबना असल्याने जागरूक नागरिक आणि वाहनचालकांनी मृत गाय तातडीने हटविण्याची मागणी केली होती.परंतु महामार्गाच्या ठेकेदार कंपनीमार्फत रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास मृत गाय महामार्गावरून हटविण्यात आली.
महामार्गावर अपघातामुळे मरून पडलेली गाय हटविण्यास अठरा तासापेक्षा अधिक वेळ लागल्याने महामार्गाच्या ठेकेदार कंपनी विरोधात गोभक्त,स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.
◾अपघातामुळे महामार्गावर मृत झालेल्या जनावरांना धडकून होणारे अपघात रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तातडीने रस्त्यावरून हटविण्याची तरतूद आहे. परंतु ठेकेदार कंपनीचे पेट्रोलिंग कर्मचारी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.
— हरबन्स ननारे,
पदाधिकारी, मानवाधिकार संघटना.