■ काल संध्याकाळी गुगल सेवा बंद होण्यामागचे गुगलने दिले स्पष्टीकरण.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
मुंबई : काल संध्याकाळी गुगल युट्युब व जीमेल या गुगलच्या सर्व सेवा बंद पडल्या होत्या. त्यामुळे गुगल सेवेचा उपयोग करणाऱ्यांना अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र गुगल ने त्यांची माफी मागून काल गुगल सेवा बंद पडल्याचे कारण सांगितले आहे.
काल संध्यकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी गुगलच्या सर्व सेवा बंद झाल्या होत्या. त्याबाबत गुगलने माफी मागितली असून पुन्हा असं घडू नये म्हणून उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले आहे. तसेच सर्वर चे इंटरनेट स्टोरेज क्विट झाले असल्याने गुगल च्या सर्व सेवा अचानक पणे बंद पडल्या होत्या. तसेच आज पहाटे ३:४७ वाजता देखील ४५ मिनिटांसाठी इंटर्नल स्टोरेज कोटाबाबत ऑथेन्टिकेशन सिस्टममध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे या दरम्यान देखील संबधित वापरकर्त्यांना समस्या निर्माण झाली होती. मात्र आता त्या बिघाडाामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त गूगलच्या इतर सेवा गूगल कॅलेंडर, गूगल ड्राईव्ह, गूगल डॉक्स आणि गूगल मीट यांच्यावरही परिणाम झाला असल्याचे सांगितले आहे. नेटवर्कशी निगडीत समस्या दाखवणाऱ्या ‘डाऊन डिटेक्टर’ ने देखील दाखवलं की, गूगलच्या जीमेल आणि यूट्यूब यांसारख्या सेवा खंडीत झाल्या आहेत. मात्र अशा पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्यात येईल असे देखील गुगलने सांगितले आहे.