पालघर दर्पण, प्रतिनिधी
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज २० वा दिवस आहे. अद्यापही तोडगा निघाला नसल्याने आंदोलन तीव्र देखील केले गेले. मात्र तरी देखील कृषी कायदे रद्द झाले नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या मतावर ठाम असून आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आज सुनावणी होणार आहे. आता यावर न्यायाल्याचा निर्णय काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ऋषभ शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलन बाबत याचिका दाखल केली आहे. या दरम्यान याचिकेत त्यांनी दिल्लीच्या सीमेवरून शेतकऱ्यांना हटवून सरकारच्या वतीने निश्चित करण्यात आलेल्या जागेवर स्थलांतरित करावे. कारण मोठ्या प्रमाणावर माणसे एकत्र आल्यावर करोनाचा धोका बळावण्याची शक्यता आहे. तसेच दिल्ली रस्त्यांवर गर्दी झाल्यामुळे शहराच्या सीमा बंद होऊन अत्यावश्यक सेवांवर त्याचा परिणाम होत आहे. असे या याचिकेत सांगण्यात आले होते.
या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी करण्यात येणार आहे. न्यायाधीश एस ए बोबडे, न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि जस्टिस वी रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी केली जाणार आहे.