पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
डहाणू नाशिक रोडवरील वेती येथे लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या भरधाव वेगाने असलेल्या पिकअप वाहण पलटी होऊन अपघात झाला आहे. या भिषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असुन 22 जण गंभीर जखमी झाले आहेत.
डहाणूतील गंजाड येथून लग्न कार्यक्रम आटोपून विक्रमगड सातखोर येथे जाणाऱ्या भरधाव पिकअप चालकांच नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहन वेती येथे पलटी झाले. या भीषण अपघातात नाना चोथे या 60 वरर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून 22 जण गंभीर जखमी आहेत. पिकअप मध्ये असलेल्या जवळपास 40 वऱ्हाडी मधील एकाचा मृत्यू झाला असुन 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कासा येथील उपजिल्हा रुग्णायलात उपचार सुरू असून गंभीर पैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर एकाला गुजरातमधील वलसाड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं आहे. या महामार्गावर ठिकाणी वारंवार अपघाताची मालिका सुरू असून याच ठिकाणी अपघातामध्ये दोन दिवसापूर्वी दोन तरुणांचा देखील मृत्यू झाला होता.